पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात
पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळा १ मे २०२६ रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक व व्याख्याते कवी सुभाष सोनवणे, ज्येष्ठ कवी, गीतकार व संगीतकार जयंत भिडे, सोल्यूशन माईंडचे सुजित दातार आणि नाट्य कलाकार निलेश दातार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सन्माननीय उपस्थितीत योगेश सुपेकर, अशोक रास्ते, ज्ञानेश्वर कोटगिरे, तुषाल शिवशरण, ॲड. प्रतिभा पोतदार, प्रशांत डोंगरे आणि डॉ. राजेश्वर हेंद्रे यांचा समावेश होता. तर जयमाला इनामदार, डॉ. मधुसूदन घाणेकर, अंजली पटवर्धन आणि राजश्री आठवले यांची विशेष उपस्थिती लाभली.
संमेलनात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तितिक्षा कानन संवर्धन पुरस्कार दरवर्षी एक कोटी झाडे दान करून त्यांचा पाठपुरावा करणारे ज्ञानेश्वर कोटगिरे यांना प्रदान करण्यात आला. तितिक्षा पर्यावरण संवर्धन पुरस्कार पर्यावरणप्रेमी प्रशांत डोंगरे यांना देण्यात आला. तितिक्षा समाज भूषण पुरस्कार सोल्यूशन माईंडचे सुजित दातार यांना प्रदान करण्यात आला. तितिक्षा काव्य रत्न पुरस्कार ॲड. प्रतिभा पोतदार यांना देण्यात आला. तितिक्षा काव्य कोहिनूर पुरस्कार डॉ. मानसी पाटील यांना प्रदान करण्यात आला. तितिक्षा कला संवर्धन पुरस्कार योगेश सुपेकर यांना देण्यात आला, तर तितिक्षा साहित्यशिरोमणी कोहिनूर पुरस्कार अशोक रास्ते यांना प्रदान करण्यात आला.
तितिक्षा ग्रंथ पुरस्कार २०२६ चा वितरण सोहळाही यावेळी पार पडला. विविध साहित्यप्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांचा गौरव करण्यात आला. डॉ. रॅ. र. पु. परांजपे स्मृती अंतर्गत तितिक्षा सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्रा. जयंत खेडकर यांच्या ‘चला गणित शिकूया’ या ग्रंथमालेला प्रदान करण्यात आला. आत्मचरित्र विभागात विश्वास देशपांडे यांचे ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’, भारत सातपुते यांचे ‘जागरण’, प्रा. डॉ. भालचंद्र रघुनाथ सूर्यवंशी यांचे ‘राजहंस’ आणि दत्तात्रय हिर्लेकर यांचे ‘कर्तव्य पूर्ती’ या ग्रंथांचा सन्मान करण्यात आला. चरित्रलेखन विभागात जयंत कुलकर्णी यांचे ‘विवेकानंद घडताना’ आणि शुभांगी खरे यांचे ‘साहिल एक शब्दगारुड’ या ग्रंथांचा गौरव करण्यात आला.
लेखसंग्रह विभागात सुनिता कावसनकर यांचे ‘भारतीय संस्कृती अध्यात्म व इतिहास’, विलास बाबर यांचे ‘विलासचे वैचारिक वैभव’, दया वाकडे यांचे ‘मैत्र जीवांचे’, विनोद पंचभाई यांचे ‘कर्मयोगी गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज’, गजानन परब यांचे ‘जवळून डोंगर साजरे’, अनिल पाटील यांचे ‘काही मनातले, काही जनातले’ आणि विकास भावे यांच्या ‘ओठावरली गाणी‘ या ग्रंथांचा गौरव करण्यात आला.
कादंबरी विभागात सारिका कंदलगांवकर यांचे ‘देवि रक्षति रक्षितः’, मनोज अंबिके यांचे ‘कर्ण पुत्र आणि अस्त्र जन्म रहस्य’ (भाग १ व २), आशा नेगी यांचे ‘लव इज लव’ आणि डॉ. स्मिता निखिल दातार यांचे ‘एक होती हिडिंबा’ या कादंबऱ्यांना पुरस्कार देण्यात आले. कथासंग्रह विभागात दत्तात्रय सैतवडेकर यांचे ‘कालचक्र’, जयदीप वैद्य यांचे ‘प्रेमाचे किस्से’ आणि रामदास खरे यांचे ‘साईड इफेक्ट’ यांचा गौरव करण्यात आला.
बालसाहित्य विभागात गिरीश वसेकर यांना ‘पापा’ या किशोर लेखसंग्रहासाठी, तसेच डॉ. नंदा संतोष हरम यांना विज्ञानकथा आणि क्षिप्रा शरद शहाणे यांना ‘इवलसं आभाळ’ या बालकादंबरीसाठी सन्मानित करण्यात आले. बालकविता विभागात कविता दिलीप झुंजारराव यांच्या ‘आता जाऊ या सूर्यावर’ या संग्रहाचा गौरव करण्यात आला.
कवितासंग्रह विभागात कमलाकर राऊत यांचे ‘कवेत विसावल्या तारका’, प्रदीप बडदे यांचे ‘माणुसकीची अंत्ययात्रा’, प्रतिभा पवार यांचे ‘ती अजून जिवंत आहे’, नीलिमा फाटक यांचे ‘तीन एके तीन’, वर्षा तुपे यांचे ‘शब्द साज’ आणि डॉ. स्मिता मुकणे यांचे ‘ऋतू रंग’ या संग्रहांचा गौरव करण्यात आला. रंजना लसणे, नीला चित्रे, रूपमती पांडुरंग देशमुख, ज्योती हमीने, रंजना देवी भोईटे आणि दीपाराणी गोसावी यांच्या काव्यसंग्रहांनाही उत्कृष्ट ग्रंथ तसेच संजय माने यांच्या ‘काव्यांकुर‘ काव्यसंग्रहाला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.
आशयघन, मुक्तछंद, छंदोबद्ध, सामाजिक जाणीव, ग्रामीण, अल्पाक्षरी आणि निसर्ग कविता या विभागांमध्येही विविध कवींचा सन्मान करण्यात आला. डॉ. मानसी पाटील यांचे ‘मन गाभारा’, मारुती काशीनाथ थिटे यांचे ‘भिरुड’, बाळासाहेब तोरसकर यांचे ‘शब्द झेलताना’, अरविंदा भामरे यांचे ‘शापित कोलाहलाच्या नांदी’, प्रा. शरदचंद्र काकडे यांचे ‘फाशी’, सुविद्या करमरकर यांचे ‘माझे आकाश’, सुनिता वैद्य यांचा ‘अक्षरांचा कशिदा‘, डॉ. चंद्रकांत लेनपुरे यांचा ‘सत्य साई रंग‘ आणि रचना वसेकर यांचे ‘निसर्ग गंध’ या संग्रहांचा विशेष गौरव करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट भावस्पर्शी काव्यसंग्रह सुनिता विजय सुरवाडे, वैचारिक काव्य हेमलता गीते, तर उत्कृष्ट वैचारिक काव्य प्रकाश पाठक यांना प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट प्रतिनिधिक काव्यसंग्रह अजिता मुळीक संपादित ‘युगंधर‘ आणि कांचन मून यांच्या ‘बाबा' काव्यसंग्रह देण्यात आला.
चारोळी संग्रह विभागात महेश भिकाजी बंडबे यांचे ‘मयावळी’, प्रा. डॉ. जेनेट बोर्जिस यांचे ‘काव्यसुमने’ आणि स्मिता मुकणे यांचे ‘पसरले सुरेख रंग’ यांचा सन्मान करण्यात आला. नाटक विभागात सूर्यकांत तिवडे यांचे ‘स्वराज्याचा साक्षीदार राजगड’ आणि संदीप मणेरीकर यांचे ‘संगीत प्राक्तनयोग’ या नाटकांना पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमात ‘श्रीराम गाथा’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे तसेच ‘डहाळी’ या अनियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. श्रीराम गाथा, रामभक्त हनुमान, माझी कविता आणि हायकू या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान व्यासपीठावर करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी, विजय सातपुते आणि प्रिया प्रमोद दामले यांनी केले. निमंत्रक म्हणून अजिता मुळीक आणि भालचंद्र शिर्के यांनी जबाबदारी सांभाळली. एम. अजया यांनी तितिक्षा भावार्थ परिवाराच्या वतीने मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत इतिहास संशोधक मंडळ आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी विशेष सहाय्य केले. विविध साहित्यिक आणि कलात्मक सत्रांमुळे संमेलनाला विशेष रंगत प्राप्त झाली. उपस्थित साहित्यप्रेमींनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत