Contact Banner

सावदा येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या निकृष्ट कामावरून नागरिकांमध्ये नाराजी

 

savda-cement-concrete-road-poor-quality-work-public-anger

सावदा येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या निकृष्ट कामावरून नागरिकांमध्ये नाराजी

लेवाजगत न्यूज सावदा : शहरातील विश्राम गृह ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरील खडी उखडत असून कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सिमेंट काँक्रीटचा रस्ता टिकाऊ असावा अशी अपेक्षा असताना, काम सुरू असतानाच खडी निघत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

“सावदा शहराच्या इतिहासात असा निकृष्ट दर्जाचा रस्ता प्रथमच पाहायला मिळत आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, हा रस्ता पालिका प्रशासनामार्फत नसून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केला जात असल्यानेच अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

संबंधित विभागाने तातडीने या कामाची चौकशी करून गुणवत्तापूर्ण काम करावे तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.