Contact Banner

सावदा पालिका संचलित श्री आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल 82.75 टक्के

 

savda-ag-highschool-na-go-patil-junior-college-ssc-result-82-75-percent

सावदा पालिका संचलित श्री आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल 82.75 टक्के

सावदा : सावदा नगर परिषद संचलित श्री आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 82.75 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

यामध्ये प्रतीक प्रकाश जोशी याने 84.80 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला, तर अन्सारी मोहम्मद आवेश आसिफ याने 82.80 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला.

शाळेत एकूण 58 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल 82.75 टक्के लागला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण, शिक्षण सभापती सचिन बराटे, गटनेते सौ. रंजना जितेंद्र भारंबे, श्री राजेश गजाननराव वानखेडे तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी भूषण वर्मा, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक-नगरसेविका यांनी अभिनंदन केले.

तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश गणू भालेराव, पर्यवेक्षक श्री संजय मोतीराम महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.