तांदलवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
तांदलवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
लेवाजगत न्यूज तांदलवाडी (ता. रावेर) : तांदलवाडी येथे पुण्यश्लोक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष दुर्गेश पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन सुधाकर चौधरी, जगदीश नमायते, राहुल पाटील, नितीन पाटील, राजेंद्र पाटील, जगदीश पाटील, अतुल महाजन, संजय महाजन, किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी आणि जनहितवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या कार्याला उजाळा देत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत