यावल शहरात घराचा स्लॅब कोसळून क्रिकेट खेळणाऱ्या १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
यावल शहरात घराचा स्लॅब कोसळून क्रिकेट खेळणाऱ्या १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
लेवाजगत न्यूज यावल -शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथे रविवारी सायंकाळी क्रिकेट खेळत असताना घरासमोरील पोर्चचा स्लॅब अचानक कोसळल्याने रणवीर जगदीश गायकवाड (वय १०) हा बालक गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रणवीर हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. चार वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याची आई मुलगा व मुलीचे पालनपोषण करत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत