Contact Banner

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

12-year-old-freed-from-addiction-through-counselling-and-treatment-at-dr-ulhas-patil-hospital


हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

जळगाव | प्रतिनिधी-

वय अवघे १२ वर्षे... हातात पुस्तकांऐवजी मद्याची बाटली आणि त्यानंतर गांजा व इतर नशायुक्त पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या एका बालकाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांच्या प्रयत्नांमुळे नवजीवन मिळाले आहे. औषधोपचार आणि समुपदेशनाच्या माध्यमातून या बालकाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून त्याचे मन पुन्हा शिक्षण आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळू लागले आहे.



जळगाव शहरातील दादावाडी परिसरात राहणारा हा १२ वर्षीय विद्यार्थी चुकीच्या मित्रसंगतीमुळे प्रथम मद्यपानाच्या आहारी गेला. त्यानंतर गांजा आणि सोल्युशनसारख्या नशायुक्त पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात केली. वाढत्या व्यसनामुळे त्याचा स्वभाव चिडचिडा झाला होता. तसेच भूक कमी होऊन आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ लागले. मुलाच्या बदललेल्या वागणुकीमुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होते.

पालकांनी तातडीने मुलाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. येथे मानसोपचार तज्ज्ञांच्या पथकाने त्याची सखोल तपासणी करून सीटी स्कॅनसह आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यानंतर औषधोपचारासोबत नियमित समुपदेशन सुरू करण्यात आले. व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्याला विविध कलात्मक व सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात आले.

या उपचार प्रक्रियेमुळे बालकाच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येत असून त्याच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

तज्ज्ञांचे मत

"या बालकाला चुकीच्या मित्रसंगतीमुळे व्यसनाची सवय लागली होती. आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि संगत यांचा मुलांच्या मनावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे औषधोपचारासोबत समुपदेशनावर विशेष भर देण्यात आला. दोन्ही उपचारपद्धतींच्या मदतीने बालकामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात यश आले आहे," असे यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.