Contact Banner

सावद्यात हजरत पीर मंजन शाह बाबा संदल व लंगरचे आयोजन

 

**sawda-hazrat-pir-manjan-shah-baba-sandal-and-langar-progra

सावद्यात हजरत पीर मंजन शाह बाबा संदल व लंगरचे आयोजन

लेवाजगत न्यूज | सावदा

सावदा येथील स्वामीनारायण नगर रोडवरील स्टेट बँकेजवळ असलेल्या हजरत पीर मंजन शाह सरकार यांच्या संदल शरीफ मिरवणुकीचे आयोजन बुधवार, दि. ७ रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे.

या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हजरत पीर मंजन शाह बाबा यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


**sawda-hazrat-pir-manjan-shah-baba-sandal-and-langar-progra


संदल कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांसाठी लंगरचेही आयोजन करण्यात आले आहे. हजरत पीर मंजन शाह वली यांच्या भक्तांनी एकत्र येऊन वांग्याची भाजी, वरण व बट्टीचा प्रसाद उपलब्ध करून दिला आहे. सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या या कार्यक्रमात सर्व धर्मीय नागरिक सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन मुजावर महेमुद पिंजारी, पिरखा तडवी, रमजान तडवी, सलीम तडवी, मुराद तडवी, नवाज तडवी, समीर तडवी तसेच अन्य भक्तांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

तसेच लंगर व संदल कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सलीम खान, जमशेर खान, अमजद खान, अयूब खान, फिरोज खान, कादर खान आदींनी विशेष योगदान दिले आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.