Contact Banner

पंढरपूर आषाढी वारीसाठी अंजाळेकर महाराजांच्या दिंडीचे प्रस्थान; रामकृष्ण हरीच्या गजरात भक्तिमय

 

anjalekar-maharaj-dindi-departs-for-pandharpur-ashadhi-wari

पंढरपूर आषाढी वारीसाठी अंजाळेकर महाराजांच्या दिंडीचे प्रस्थान; रामकृष्ण हरीच्या गजरात भक्तिमय वातावरण

सावदा | प्रतिनिधी : पंढरपूर आषाढी वारीसाठी खानदेश भूषण वारकरी ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या दिंडीचे गादीपती ह.भ.प. धनराज महाराज यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात प्रस्थान झाले. विणेकरी ह.भ.प. चिंतामण महाराज यांच्या मार्गदर्शन व निगराणीखाली निघालेल्या या वारीत वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत.






वारीत ह.भ.प. जितू महाराज, ह.भ.प. शालिग्राम महाराज, ह.भ.प. सुभाष महाराज, ह.भ.प. दिनेश महाराज, ह.भ.प. भुरा महाराज तसेच ह.भ.प. संजय महाराज यांची उपस्थिती लाभली आहे. याशिवाय सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, डॉ. संजय भंगाळे, एकलव्य कोल्हे, राजेंद्र भंगाळे, सागर प्रमोद चौधरी, माधुरी भंगाळे, प्रतिभा महाजन (बऱ्हाणपूर), राजू राणे (सुरत) व दीपक चौधरी (अंजाळे) यांच्यासह सुमारे ५०० वारकरी भक्त या वारीत सहभागी झाले आहेत.

"रामकृष्ण हरी"च्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात दिंडीचे प्रस्थान झाले. वारकऱ्यांचा आजचा मुक्काम भुसावळ येथे असून, पुढील प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू राहणार आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने परिसरात भक्तीमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.