Contact Banner

धनंजय शिरीषदादा चौधरी यांनी केले वै. दिगंबर महाराज चिनावलकर दिंडीचे उत्साहपूर्ण स्वागत

dhananjay-shirishdada-chaudhari-welcomes-digambar-maharaj-chinawalkar-dindi-at-khiroda


धनंजय शिरीषदादा चौधरी यांनी केले वै.दिगंबर महाराज चिनावलकर दिंडीचे उत्साहपूर्ण स्वागत 


खिरोदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी): "जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया..." या अभंगाच्या ओळींप्रमाणे विठ्ठल भक्तीचा अखंड गजर करत वै. दिगंबर महाराज चिनावलकर आषाढी यात्रा पायी दिंडीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान झाले.

यावेळी खिरोदा गावात दिंडीचे भक्तिमय वातावरणात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पूर्व धनंजय शिरीषदादा चौधरी यांनी दिंडीचे स्वागत करून ह.भ.प. श्री दुर्गादास महाराज यांचे आशीर्वाद घेतले.






वारकरी संप्रदायाची अखंड भक्तीपरंपरा, विठ्ठल नामाचा गजर आणि संतांच्या विचारांचा अमूल्य वारसा समाजाला सतत प्रेरणा देत राहतो. आषाढी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मता, भक्ती आणि संस्कारांचे जिवंत प्रतीक असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

विठ्ठल भक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला असून, "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "श्री ज्ञानदेव तुकाराम" च्या गजरात दिंडी पुढील प्रवासाला मार्गस्थ झाली.

🚩 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल!
🚩 श्री ज्ञानदेव तुकाराम!
🚩 पंढरीनाथ महाराज की जय! 🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.