अत्याधुनिक आयुर्वेदिक पद्धतीने जखमांचे प्रभावी व्यवस्थापन मधुमेह, बेडसोर्स, शस्त्रक्रियेनंतरच्या व दीर्घकाळ न भरणाऱ्या जखमांवर यशस्वी उपचार
अत्याधुनिक आयुर्वेदिक पद्धतीने जखमांचे प्रभावी व्यवस्थापन
मधुमेह, बेडसोर्स, शस्त्रक्रियेनंतरच्या व दीर्घकाळ न भरणाऱ्या जखमांवर यशस्वी उपचार
जळगाव (प्रतिनिधी) : आधुनिक जीवनशैली, मधुमेह, अपघात तसेच विविध कारणांमुळे होणाऱ्या आणि दीर्घकाळ न भरणाऱ्या जखमांच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर येथे अत्याधुनिक आयुर्वेदिक जखम व्यवस्थापन सेवा उपलब्ध करून रुग्णांना प्रभावी उपचार दिले जात आहेत.
आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींचा समन्वय साधत संस्थेत विविध प्रकारच्या जखमांवर उपचार केले जात आहेत. विशेषतः मधुमेहामुळे होणाऱ्या जखमा, शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा, बेडसोर्स, संसर्गजन्य जखमा तसेच दीर्घकाळ न भरणाऱ्या जखमांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शनाखाली उपचार केले जात आहेत.
संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार योजना तयार केली जाते. आयुर्वेदिक औषधे, स्थानिक उपचार, पंचकर्मातील निवडक प्रक्रिया तसेच जखमांच्या नैसर्गिक भरून येण्याच्या प्रक्रियेला गती देणाऱ्या आधुनिक तंत्रांचा वापर करून रुग्णांना लवकर आराम मिळत असल्याचे सांगण्यात आले.
संस्थेचे अधिष्ठाता व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, आयुर्वेदिक जखम व्यवस्थापन ही केवळ जखम भरून काढण्याची प्रक्रिया नसून रुग्णाच्या संपूर्ण आरोग्याचे संतुलन राखण्यावर भर देणारी उपचारपद्धती आहे. त्यामुळे जखम लवकर भरून येण्यास, वेदना कमी होण्यास तसेच जखमांची पुनरावृत्ती टाळण्यास मदत होते.
गुणवत्तापूर्ण, परवडणारी आणि संशोधनाधारित आयुर्वेदिक आरोग्यसेवा देण्याच्या आपल्या ध्येयाशी कटिबद्ध असलेले डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णांना आधुनिक सुविधांसह आयुर्वेदिक उपचार सेवा प्रदान करत असून या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत