RRB ALP Bharti 2026 : भारतीय रेल्वेत 11,127 असिस्टंट लोको पायलट पदांची मेगाभरती; 14 जूनपर्यंत अर्जाची संधी
RRB ALP Bharti 2026 : भारतीय रेल्वेत 11,127 असिस्टंट लोको पायलट पदांची मेगाभरती; 14 जूनपर्यंत अर्जाची संधी
लेवाजगत न्यूज : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय रेल्वेकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या तब्बल 11,127 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. दहावी उत्तीर्ण आणि ITI किंवा संबंधित अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवीधारक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी 14 जून 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
या भरती अंतर्गत देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये असिस्टंट लोको पायलट पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांचे वय 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षे तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रतेमध्ये 10वी उत्तीर्णसह ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट आदी ट्रेड) किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल अभियांत्रिकीतील डिप्लोमा अथवा पदवी आवश्यक आहे.
सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹500 असून SC, ST, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला उमेदवारांसाठी ₹250 शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेतील प्रतिष्ठित आणि स्थिर नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी असल्याने पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाची माहिती
पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट (ALP)
एकूण जागा : 11,127
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख : 14 जून 2026
परीक्षा : नंतर जाहीर केली जाईल


कोणत्याही टिप्पण्या नाहीत