पंचकर्म उपचारांसाठी जळगावकरांना दिलासा; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा सुरू
पंचकर्म उपचारांसाठी जळगावकरांना दिलासा; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा सुरू
जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, जळगाव खुर्द येथे पंचकर्म उपचार विभागात अनुभवी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. पूनम सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे.
आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या या संस्थेत आता नागरिकांना वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या प्रमुख पंचकर्म उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आयुर्वेदातील पंचकर्म ही शरीरातील दोषांचे शुद्धीकरण करून आरोग्य संवर्धन करणारी प्रभावी आणि समग्र चिकित्सा पद्धती मानली जाते.
पंचकर्म उपचारांमुळे सांधेदुखी, मणक्यांचे विकार, त्वचारोग, स्थूलता, तणाव, निद्रानाश, पचनसंस्थेचे विकार तसेच विविध जुनाट आजारांमध्ये लाभ मिळू शकतो. रुग्णांच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार योजना तयार करून आधुनिक सुविधा आणि पारंपरिक आयुर्वेदिक तत्त्वांचा समन्वय साधत उपचार केले जात आहेत.
डॉ. पूनम सुरवाडे यांनी सांगितले की, पंचकर्म ही केवळ उपचार पद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखणारी आयुर्वेदाची समग्र चिकित्सा आहे. योग्य वेळी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या पंचकर्म उपचारांमुळे अनेक दीर्घकालीन आजारांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात.
महाविद्यालय प्रशासनाने नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी मोहित येवले यांच्याशी ८८८८१३१६१९ या क्रमांकावर संपर्क साधावा.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत