भुसावळ–फैजपूर मार्ग ३० दिवस बंद; जड व हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर
भुसावळ–फैजपूर रस्ता महिनाभर बंद; वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सावदा-
हे पण एका ~*१६ जूनपासून भुसावळ–फैजपूर मार्ग बंद;जड व हलक्या वाहनांसाठी वेगळे मार्ग-पर्यायी मार्गासाठी बातमी ऐका*
भुसावळ–फैजपूर मार्गावरील रस्ता दुरुस्ती व सुधारणा कामामुळे १७ जून ते १६ जुलै २०२६ या कालावधीत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी प्रशासनाने जाहीर केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कालावधीत वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी जड व हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. जड वाहनांसाठी फैजपूर–हंबर्डी–हिंगोणा–सांगवी–चिंतोडा–यावल–भुसावळ हा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर हलक्या वाहनांसाठी फैजपूर–हंबर्डी–भालोद–चिखली–अंजाळे–भुसावळ या मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रस्ता सुधारणा प्रकल्पाचे काम सुरळीत आणि सुरक्षितरीत्या पूर्ण व्हावे तसेच अपघातांचा धोका टाळता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस व संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत