Contact Banner

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार महादेव हॉस्पिटलमध्ये फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी व लेझर तंत्रज्ञानाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

 




mahadav-hospital-successfully-performs-rirs-laser-kidney-stone-surgery-jalgaon


चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

महादेव हॉस्पिटलमध्ये फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी व लेझर तंत्रज्ञानाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

लेवाजगत न्यूज जळगाव : मूत्रपिंडातील खड्यांवरील उपचारांसाठी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत महादेव हॉस्पिटलने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉस्पिटलमध्ये फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी विथ लेझर पल्व्हरायझेशन या अत्याधुनिक पद्धतीची शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वीरीत्या पार पडली असून रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे.


mahadav-hospital-successfully-performs-rirs-laser-kidney-stone-surgery-jalgaon


मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील ५० वर्षीय महिलेच्या उजव्या मूत्रपिंडात खडा असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी (RIRS) विथ लेझर पल्व्हरायझेशन ही आधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेद्वारे कोणतीही बाह्य चीर न देता मूत्रमार्गातून लवचिक युरेटेरोस्कोप मूत्रपिंडापर्यंत पोहोचवून लेझरच्या साहाय्याने खड्यांचे सूक्ष्म कणांमध्ये विघटन करण्यात आले.

ही पद्धत पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत कमी वेदनादायी असून रक्तस्रावाचा धोका कमी करते. तसेच रुग्णाला कमी कालावधीत पूर्ववत होण्यास मदत होते. त्यामुळे उपचार अधिक सुरक्षित आणि परिणामकारक मानले जातात.

या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी युरोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. हेमंत केळकर, प्रा. डॉ. हर्षद चौहान, डॉ. शुभम चौधरी आणि डॉ. श्रीकांत रेड्डी यांनी विशेष परिश्रम घेतले. भूलतज्ज्ञांच्या चमूमध्ये प्रा. डॉ. रघुनाथ बराटे व डॉ. ननिता चौधरी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

रुग्णाची प्रकृती सध्या समाधानकारक असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. अत्याधुनिक फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी आणि लेझर तंत्रज्ञानामुळे मूत्रपिंड व मूत्रमार्गातील खड्यांवर आता अधिक सुरक्षित, प्रभावी आणि जलद उपचार उपलब्ध होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे महादेव हॉस्पिटलने कमीत कमी चिरफाडीतून अत्याधुनिक उपचार देण्याच्या दिशेने आणखी एक उल्लेखनीय पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.