Contact Banner

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ शक्तितोलन स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयाला रौप्यपदक

dn-college-faizpur-wins-silver-medal-at-all-india-inter-university-powerlifting-championship-2026


अखिल भारतीय आंतरविद्यापीठ शक्तितोलन स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयाला रौप्यपदक

फैजपूर | प्रतिनिधी


dn-college-faizpur-wins-silver-medal-at-all-india-inter-university-powerlifting-championship-2026


फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ शक्तितोलन (पॉवरलिफ्टिंग) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयासह संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

जून २०२६ मध्ये चेन्नई येथील हिंदुस्तान युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पुरुष-महिला शक्तितोलन स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारी एम.ए. (हिंदी) प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु. गायत्री संजय सोनवणे हिने ६९ किलो वजन गटात अतिशय चुरशीच्या लढतीत एकूण ५३२.५ किलो वजन उचलत रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) पटकावले.

तसेच कला शाखेचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी ऋषिकेश तेली याने ८३ किलो वजन गटात ७६० किलो वजन उचलून उत्कृष्ट कामगिरी केली. अवघ्या २.५ किलो वजनाच्या फरकामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर १२० किलो वजन गटात पवनकुमार हजारे यांनीही दमदार खेळाचे प्रदर्शन केले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा मधुस्नेह परिवाराचे कुटुंब प्रमुख शिरिषदादा मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष सुधाकर काशीराम चौधरी, मिलिंद शंकर वाघुळदे (बापूदादा), चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन किशोर रामदास चौधरी, सचिव मुरलीधर तोताराम फिरके, सहसचिव नंदकुमार आसाराम भंगाळे, निमंत्रित सदस्य संजय काशिनाथ चौधरी, प्राचार्य डॉ. शशिकांत सदाशिव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व खेळाडू मित्रांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.