Contact Banner

पुरवठा कार्यालयातील लिपिकाची आत्महत्या; दोन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

 

purvatha-karyalayatil-lipik-sagar-rajendra-teli-suicide-faizpur

पुरवठा कार्यालयातील लिपिकाची आत्महत्या; दोन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह


purvatha-karyalayatil-lipik-sagar-rajendra-teli-suicide-faizpur


फैजपूर (प्रतिनिधी) : फैजपूर येथील रहिवासी तथा यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेले लिपिक सागर राजेंद्र तेली (वय ३०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर तेली हे फैजपूर शहरातील सराफ कॉलनी परिसरात वास्तव्यास होते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्यांची यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात लिपिक म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच त्यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवून शासकीय सेवेत प्रवेश केला होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

बुधवारी दुपारी घरात कोणीही नसताना त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.