Contact Banner

उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

 


उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

अकोला, प्रतिनिधी : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात भुसावळचे रिजन चेअरमन डॉ. उमाकांत चौधरी यांना वर्षभरातील उत्कृष्ट सामाजिक कार्य, प्रभावी नेतृत्व आणि सेवाभावी योगदानाची दखल घेत प्रतिष्ठेचा गोल्ड मेडल (सुवर्ण पदक) प्रदान करून गौरविण्यात आले.

दि. २८ जून २०२६ रोजी अकोला येथे झालेल्या सोहळ्यात लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल अश्विनकुमार बजोरिया यांच्या हस्ते डॉ. चौधरी यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी गिरीशजी सिसोदिया, द्वितीय प्रांतपाल सुप्रिया कोतवाल, सचिव डॉ. गर्गे, कोषाध्यक्ष डॉ. मुरारका, अध्यक्ष प्रमोद नेमाडे, गोपाल अग्रवाल, डॉ. भोलाणे तसेच भुसावळ लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिजन चेअरमन म्हणून कार्यरत असताना डॉ. उमाकांत चौधरी यांनी विविध सेवाभावी उपक्रम प्रभावीपणे राबविले. सदस्यसंख्या वाढविणे, संघटन कौशल्य, उत्कृष्ट नेतृत्व आणि समाजसेवेप्रती असलेली त्यांची समर्पित वृत्ती यामुळे त्यांनी संस्थेमध्ये विशेष ठसा उमटविला. त्यांच्या या सर्वांगीण कामगिरीची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा गोल्ड मेडल अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

डॉ. चौधरी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील, डॉ. बोरोले तसेच भुसावळ लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. हा सन्मान केवळ भुसावळ लायन्स क्लबसाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सामाजिक बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि प्रभावी नेतृत्वाच्या बळावर डॉ. उमाकांत चौधरी यांनी मिळविलेला हा सन्मान भविष्यातील सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरणार असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.