Contact Banner

स्व.गोदावरी वासुदेव पाटील यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

free-health-check-up-camp-by-bahinabai-senior-citizen-womens-association-in-memory-of-godavari-vasudev-patil


स्व.गोदावरी वासुदेव पाटील यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ 

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

लेवाजगत न्यूज जळगाव : बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्था यांच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्व. गोदावरी वासुदेव पाटील यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.






 हे शिबिर रविवार, २८ जून  रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत चैतन्य नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ, कन्या शाळेजवळ,  येथे होणार आहे. या शिबिरासाठी महादेव हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभणार असून ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेच्या अध्यक्षा आशा तळेले व कार्यकारिणी मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध आजारांची प्राथमिक तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आणि वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकारिणी सदस्यांनी परिसरातील ज्येष्ठ महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.