गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
जळगाव | प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगाव येथील डिपार्टमेंट ऑफ बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज अंतर्गत प्रथम वर्ष अभियांत्रिकी (२०२५-२६) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महाविद्यालयाच्या एकूण गुणवत्तायादीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स शाखेचा विद्यार्थी चेतन दिनेश चौधरी याने ९.६१ सीजीपीए गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. इलेक्ट्रिकल शाखेची अंकिता संजय घाटे हिने ९.३२ सीजीपीए गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर संगणक शाखेचा गौरव रामा इंगळे, संगणक शाखेची अल्फिया नाज शोएब खातीक आणि इलेक्ट्रिकल शाखेची युक्ता भानुदास तळेले यांनी प्रत्येकी ९.३० सीजीपीए गुण मिळवत संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला.
शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी : अंकिता संजय घाटे (९.३२) प्रथम, युक्ता भानुदास तळेले (९.३०) द्वितीय, राजश्री अनिल यादव (९.११) तृतीय.
ई अँड टीसी : मैती अंतरा संजय (८.९८) प्रथम, भूमिका लक्ष्मण भंगाळे व अचल सत्यजित नर्खेडे (प्रत्येकी ८.६१) संयुक्त द्वितीय, जान्हवी उमाकांत बारजीभे (८.५७) तृतीय.
मेकॅनिकल अभियांत्रिकी : श्वेजल संजय परासे (८.१४) प्रथम, जान्हवी लक्ष्मीकांत राजपूत (७.४३) द्वितीय, संकेत दिलीप बागड (७.२०) तृतीय.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स : चेतन दिनेश चौधरी (९.६१) प्रथम, खुशबू धनराज नाले (९.०७) द्वितीय, भैरवी मनीष कुरकुरे (८.९३) तृतीय.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश संपादन करता आल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयात आधुनिक शिक्षणसुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थी सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत आहेत. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी कायम राहील, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत