Contact Banner

रावेर मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवरील SIR-2026 मॅपिंगची चौकशी करण्याची मागणी

raver-sir-2026-voter-mapping-investigation-demand


रावेर मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवरील SIR-2026 मॅपिंगची चौकशी करण्याची मागणी

लेवाजगत न्यूज रावेर : रावेर विधानसभा मतदारसंघातील SIR-2026 (Special Intensive Revision) प्रक्रियेदरम्यान काही मतदान केंद्रांमध्ये मतदार मॅपिंग व पडताळणीचे प्रमाण संशयास्पदरीत्या जास्त असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी रावेर-यावल विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा BLA-1 विलास चौधरी यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे.






         निवेदनात रावेर व यावल तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदार मॅपिंग व पडताळणीचे काम अत्यंत मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्याचे दर्शविण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. काही विशिष्ट मतदान केंद्रांवरील मॅपिंग व पडताळणीचे प्रमाण इतर केंद्रांच्या तुलनेत असामान्यरीत्या जास्त असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे सदर प्रक्रियेत समान निकष, एकसमान कार्यपद्धती, पारदर्शकता व निष्पक्षतेबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित मतदान केंद्रांवरील मॅपिंग व पडताळणी प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून वापरण्यात आलेल्या निकषांची, प्रत्यक्ष पडताळणीची वस्तुस्थिती तसेच नोंदविण्यात आलेल्या माहितीची सत्यता तपासण्यात यावी. आवश्यक असल्यास संपूर्ण प्रक्रियेची पुनर्पडताळणी (Re-verification) करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तसेच भारत निवडणूक आयोग यांना सादर करण्यात आल्या आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.