Contact Banner

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन एआय परिषद उत्साहात संपन्न

godavari-management-college-national-online-ai-conference-successfully-concluded-jalgaon


गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन एआय परिषद उत्साहात संपन्न

जळगाव, दि. ९ (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय, जळगाव येथे "वाणिज्य आणि व्यवस्थापनातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि शाश्वत डिजिटल परिवर्तन" या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. देशभरातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या परिषदेत ५० हून अधिक संशोधक सहभागी झाले.


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा


परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून यांनी "विस्तारक्षम बुद्धिमत्ता : एआय वाणिज्य क्षेत्रावर काय परिणाम करत आहे आणि ती तुमच्याकडून काय अपेक्षा करते?" या विषयावर मार्गदर्शन केले.

समारोप सत्रात यांनी ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट, ग्राहक सेवा आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स क्षेत्रातील एआयमुळे होत असलेल्या बदलांचा आढावा घेतला. परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डिजिटल व्यवसाय, सायबर सुरक्षा आणि शाश्वत व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर चर्चासत्रे व तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले.

परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार होते. यावेळी गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत एस. वारके, डॉ. नीलिमा पी. वारके, डॉ. अनिल पी. डोंगरे, डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. ए. पी. सरोदे, डॉ. सुषमा एस. पाटील आणि डॉ. माधुलिका सोनवणे यांची ऑनलाइन उपस्थिती व विशेष सहकार्य लाभले.

डॉ. चेतन सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक डॉ. प्राजक्ता आर. पाटील यांनी परिषदेचे नियोजन केले. परिषद सचिव म्हणून प्रा. आफरीन खान यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच प्रा. स्मिता एन. चौधरी, प्रा. वैजयंती पी. असोदेकर, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दीपक दांडगे, प्रा. चारुशीला चौधरी, प्रा. हर्षिता तलरेजा, प्रा. प्रशांत बाहेकर, प्रा. लीना पाटील, प्रा. मानसी अहिरे आणि प्रा. साक्षी पोलाखरे यांनी परिश्रम घेतले.

परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.