Contact Banner

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अॅड. जगदीश कापडे यांचे दुःखद निधन

 

jagdish-kapade-former-shiv-sena-district-chief-bhusawal-passes-away

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अॅड. जगदीश कापडे यांचे दुःखद निधन

लेवा जगत न्यूज | भुसावळ प्रतिनिधी

भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस राहणारे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अॅड. जगदीश कापडे यांचे मंगळवार, दि. ९ जून २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व कायदे क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. १० जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भुसावळ येथील त्यांच्या निवासस्थानावरून (बाजारपेठ पोलीस स्टेशन मागील परिसर) निघणार आहे.


jagdish-kapade-former-shiv-sena-district-chief-bhusawal-passes-away


अॅड. जगदीश कापडे हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. ते अॅड. मिलिंद जगदीश कापडे यांचे वडील होत.

लेवा जगत न्यूज परिवारातर्फे अॅड. जगदीश कापडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व कापडे परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐
ॐ शांती 🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.