माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अनुभव व छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन
माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अनुभव व छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन
लेवाजगत न्यूज सावदा-
खानदेशचे ज्येष्ठ लोकनेते तथा माजी मंत्री मा. आ. एकनाथराव (नाथाभाऊ) खडसे हे २ सप्टेंबर २०२६ रोजी वयाची ७४ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या जनसेवेच्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करण्यासाठी २ सप्टेंबर रोजी अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने अमृत महोत्सव समितीतर्फे नाथाभाऊ यांच्या सहवासातील, राजकीय व सामाजिक कार्यातील तसेच जनसंपर्कातील अनुभव लेखी स्वरूपात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त अनुभवांचे संकलन करून "अनुभवाचे बोल" हा स्मरणग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे.
तसेच, नाथाभाऊ यांच्या राजकीय व सामाजिक जीवनातील दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन करून विशेष "फोटो बुक" प्रकाशित करण्याचे नियोजन असल्याने नागरिक, कार्यकर्ते व हितचिंतकांनी आपल्या संग्रहातील छायाचित्रे पाठवावीत, असे आवाहन समितीने केले आहे.
लेख, आठवणी, अनुभव व छायाचित्रे ३० जून २०२६ पर्यंत eknathkhadse1952@gmail.com या ई-मेलवर किंवा संपर्क क्रमांक ९८२३२८८६८९ (प्रा. डॉ. सुनिल नेवे) व ९४२२२७८९७८ (योगेश कोलते) यांच्याकडे पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमृत महोत्सव समितीचे सचिव प्रा. डॉ. सुनिल नेवे आणि मा. आ. एकनाथराव खडसे यांचे स्वीय सचिव योगेश कोलते यांनी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत