उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांची पहिली पसंती – महादेव हॉस्पिटल
महादेव हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचे केंद्र; न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण
जळगाव | लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात असलेले महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि रुग्णकेंद्रित उपचार पद्धतीमुळे परिसरातील नागरिकांसाठी आशेचे केंद्र ठरत आहे. दर्जेदार आरोग्यसेवा आणि आधुनिक उपचार सुविधांमुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक रुग्णांचा या रुग्णालयावर विश्वास वाढत आहे.
महादेव हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजी, हृदयरोग, किडनी विकार, जनरल मेडिसीन, जनरल सर्जरी, अस्थिरोग, कान-नाक-घसा विभाग, अतिदक्षता विभाग (ICU), आपत्कालीन सेवा तसेच विविध निदान सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
रुग्णांना उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी व्हावी आणि स्थानिक स्तरावरच उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. विशेषतः न्यूरोलॉजी, हृदयरोग आणि किडनीविकारांवरील उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महादेव हॉस्पिटलमध्ये २४ तास आपत्कालीन सेवा, सुसज्ज अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक निदान केंद्र, औषधालय तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी आधुनिक ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध आहे. अचूक निदान, वेळेवर उपचार आणि रुग्णांच्या गरजांना प्राधान्य देणारी सेवा यामुळे रुग्णालयाने परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
हॉस्पिटल प्रशासनाच्या माहितीनुसार, आगामी काळात आणखी काही विशेष तज्ज्ञ सेवा सुरू करण्याचा मानस असून उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महादेव हॉस्पिटल कटिबद्ध आहे. या सुविधांमुळे जळगाव आणि परिसरातील नागरिकांना महानगरांच्या तोडीची वैद्यकीय सेवा आपल्या शहरातच उपलब्ध होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत