Contact Banner

जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीची जोरदार तयारी; नंदकिशोर महाजन यांच्या विजयाचा निर्धार

 

jalgaon-mlc-election-campaign-meet-mahayuti-nandkishor-mahajan-raksha-khadse-ravindra-chavan

jalgaon-mlc-election-campaign-meet-mahayuti-nandkishor-mahajan-raksha-khadse-ravindra-chavan


जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीची जोरदार तयारी; नंदकिशोर महाजन यांच्या विजयाचा निर्धार

जळगाव, लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : जळगाव विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या वतीने जळगाव येथे प्रचार बैठक व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यास केंद्रीय राज्यमंत्री , राज्याचे मंत्री व यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बळकटी, प्रभावी जनसंपर्क, मतदान नियोजन तसेच महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी आवश्यक रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी बूथस्तरावर सक्रिय राहून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचंड विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जळगाव विधानपरिषद मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने, समर्पित भावनेने आणि पूर्ण ताकदीने काम करण्याचा संकल्प केला.

मेळाव्यास मंत्री , माजी मंत्री यांच्यासह भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मेळाव्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला अधिक वेग मिळाल्याचे चित्र दिसून आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.