Contact Banner

घरी परत येताना भीषण अपघात; कोळन्हावीतील २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

 

kolnhavi-youth-pawan-solunke-killed-in-hit-and-run-accident-near-dambhurni-yawal

घरी परत येताना भीषण अपघात; कोळन्हावीतील २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू


kolnhavi-youth-pawan-solunke-killed-in-hit-and-run-accident-near-dambhurni-yawal




यावल | प्रतिनिधी

यावल तालुक्यातील कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोळन्हावी येथील २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन रवींद्र सोळुंके (वय २६, रा. कोळन्हावी) हा १७ जून रोजी रात्री मित्रासोबत कोळन्हावी-डांभुर्णी मार्गावरील एका शेतात आयोजित पार्टीसाठी गेला होता. मध्यरात्रीनंतर जेवण झाल्यानंतर तो गावाकडे परतण्यासाठी निघाला. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी गेल्यानंतर पुन्हा दुचाकीकडे येण्यासाठी रस्ता ओलांडत असताना कोळन्हावीकडून डांभुर्णीकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.

या अपघातात पवनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह डांभुर्णीच्या दिशेने पसार झाला.

दरम्यान, पवन सोळुंके यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी शवविच्छेदन केले. अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.