महागाईचा झटका! घरगुती गॅस सिलिंडर २९ रुपयांनी महाग ३ महिन्यांत दुसऱ्यांदा दरवाढ; आजपासून नवीन दर लागू
महागाईचा झटका! घरगुती गॅस सिलिंडर २९ रुपयांनी महाग
३ महिन्यांत दुसऱ्यांदा दरवाढ; आजपासून नवीन दर लागू
लेवाजगत न्यूज | नवी दिल्ली
सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर २९ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. वाढलेले दर रविवार, ७ जूनपासून देशभर लागू झाले आहेत.
या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९१३ रुपयांवरून ९४२ रुपये झाली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून यापूर्वी ७ मार्च रोजी ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती.
तेल कंपन्यांच्या सूत्रांनुसार, वाढत्या आंतरराष्ट्रीय इंधन दरांमुळे आणि वितरण खर्चामुळे कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. दरवाढीनंतरही कंपन्यांचा तोटा पूर्णपणे भरून निघालेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या वाढीपूर्वी सरकारी तेल कंपन्यांना प्रति घरगुती एलपीजी सिलिंडरमागे सुमारे ७०३ रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता.
गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडण्याची शक्यता असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ नागरिकांसाठी आणखी एक आर्थिक धक्का मानली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत