वादळी पावसाचा परिणाम : सावदा शहराचा रविवारी पाणीपुरवठा बंद
वादळी पावसाचा परिणाम : सावदा शहराचा रविवारी पाणीपुरवठा बंद
लेवाजगत न्यूज सावदा, दि. ६ जून – आज दुपारी झालेल्या वादळी पाऊस व वाऱ्यामुळे महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीचे मोठे नुकसान झाले आहे. मांगलवाडी हेडवर्क व सावदा जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनवरील तारा तुटून वीज खांबही खराब झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून अद्याप वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही.
या तांत्रिक बिघाडामुळे सावदा नगर परिषदेचा रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी होणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती सावदा नगर परिषद पाणीपुरवठा विभाग प्रमुख प्रियांका जैन यांनी दिली आहे.
नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा जपून वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत