Contact Banner

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

लेवाजगत न्यूज | जळगाव

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भीरूड यांनी केले.

यावेळी गोदावरी हेल्थ सिटी अंतर्गत कार्यरत विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे गीत सादर करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या २८ वर्षांच्या उल्लेखनीय वाटचालीचा आढावा घेण्यात आला.


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा


उपस्थित मान्यवरांनी वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा क्षेत्रात विद्यापीठाने दिलेल्या भरीव योगदानाचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.