राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस नशिराबाद टोल नाका बूथवर उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस नशिराबाद टोल नाका बूथवर उत्स्फूर्त प्रतिसाद
नशिराबाद (प्रतिनिधी): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादच्या कार्यक्षेत्रातील विविध पोलिओ बूथवर ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेला नशिराबाद टोल नाका बूथवर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमान यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
नशिराबाद टोल नाका येथे आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, दीपक किसन तायडे, संदेश सुनील महाजन तसेच सीएचओ शोएब पटेल यांच्या पथकाने टोल नाक्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा आदी वाहनांमधील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजले.
यावेळी पालकांना पोलिओ लसीकरणाचे महत्त्व पटवून देत प्रत्येक बालक पोलिओमुक्त राहण्यासाठी सर्व पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस आवर्जून पाजावा, असे आवाहन करण्यात आले. ज्या बालकांना रविवारी बूथवर येऊन डोस घेणे शक्य झाले नाही, त्यांना पुढील तीन दिवस आरोग्य पथकाकडून घरोघरी भेट देऊन पोलिओ डोस दिला जाणार असल्याची माहितीही देण्यात आली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस नशिराबाद परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत