Contact Banner

प्रा.किसन वराडे यांच्या ‘देणे प्रतिभेचे’ गझलसंग्रहाचे २८ जूनला प्रकाशन

prof-kisan-varades-dene-pratibheche-ghazal-collection-book-launch-ceremony-on-june-28


प्रा.किसन वराडे यांच्या ‘देणे प्रतिभेचे’ गझलसंग्रहाचे २८ जूनला प्रकाशन


prof-kisan-varades-dene-pratibheche-ghazal-collection-book-launch-ceremony-on-june-28


लेवाजगत न्यूज अंबरनाथ : कवी तथा लेखक प्रा. किसन वराडे लिखित ‘देणे प्रतिभेचे’ या गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३.३० या वेळेत अंबरनाथ (पूर्व) येथील वडवली विभागातील रोटरी कम्युनिटी सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. बाजीगर प्रकाशनातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आद्य मराठी गझल संशोधक तथा गझलकार डॉ. अविनाश सांगोलेकर हे राहणार असून, शिक्षणतज्ज्ञ व संस्थाचालक प्रा. गुणवंत भंगाळे यांच्या हस्ते गझलसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भाषा अभ्यासक व साहित्यिक प्रा. संध्या महाजन उपस्थित राहणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, सुप्रसिद्ध कवी व गझलकार विजो (विजय जोशी) आणि ज्येष्ठ गझलकार तथा प्रकाशक सिराज शिकलगार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

प्रा. किसन वराडे यांच्या साहित्यप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे व दीपाली कात्रे करणार असून, प्रतिभा वराडे, विवेक-वर्षा तसेच जयेश-दिशा हे स्वागतोत्सुक म्हणून कार्यरत आहेत.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सकाळी ८ ते ९ या वेळेत स्वागत, अल्पोपहार व कवी संमेलनासाठी नोंदणी होईल. सकाळी ९ ते ९.३० या वेळेत उद्घाटन, दीपप्रज्वलन व स्वागतगीत सादर करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या कालावधीत प्रास्ताविक, गझलसंग्रहाचे प्रकाशन व मान्यवरांचे मनोगत होईल. दुपारी १.३० ते २.३० या वेळेत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दुसऱ्या सत्रात दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून, त्यानंतर समारोप होईल. कवी संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी सकाळी ९ वाजेपर्यंत प्रकाशनस्थळी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. साहित्यप्रेमी व रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.