Contact Banner

उत्कृष्ट सेवाकार्याची दखल; आमोदाचे युवराज जावळे विशेष सन्मानपत्राने गौरविले

 

yuvraj-jawale-honoured-with-special-certificate-for-excellent-service-amoda

yuvraj-jawale-honoured-with-special-certificate-for-excellent-service-amoda
जाहिरात लेवाजगत वेबसाईट


उत्कृष्ट सेवाकार्याची दखल; आमोदाचे युवराज जावळे विशेष सन्मानपत्राने गौरविले

आमोदा लेवाजगत न्यूज  प्रतिनिधी-

आमोदा गावाचे सुपुत्र तथा गटनिदेशक श्री. युवराज रामदास जावळे यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्यांतर्गत कार्यरत असलेल्या श्रीमद राजचंद्रजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मुलुंड, मुंबई येथे उत्कृष्ट सेवाकार्यासाठी “विशेष सन्मानपत्र” प्रदान करण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे आमोदा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ते गावाचे भूषण ठरले आहेत.

प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय प्रगतीसाठी तसेच शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि सेवाभावी कार्यशैलीमुळे संस्थेतील प्रशिक्षण व्यवस्थेला नवे बळ मिळाले आहे.

औद्योगिक कौशल्य विकास, रोजगारक्षमतेची जडणघडण आणि प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे सन्मानपत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी, अधिकारी, कर्मचारी तसेच औद्योगिक क्षेत्राशी प्रभावी समन्वय साधून संस्थेच्या प्रगतीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

शासकीय सेवेमधील उत्कृष्ट योगदान, नेतृत्वगुण, कर्तव्यपरायणता आणि संस्थेच्या उन्नतीसाठी केलेल्या अविस्मरणीय कार्याची पोचपावती म्हणून हा विशेष सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल आमोदा ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून संपूर्ण गावाला त्यांच्या कार्याचा अभिमान वाटत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.