रावेर तालुक्यातील गारबडी येथे वीज पडून 35 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
रावेर तालुक्यातील गारबर्डी येथे वीज पडून 35 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
लेवाजगत न्यूज रावेर :-
रावेर तालुक्यातील गारबर्डी गावात रविवारी सायंकाळी वीज पडून 35 वर्षीय गणेश बल्लू भिल यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी पावसासह वीजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी वीज कोसळून गणेश भिल यांना तीव्र विद्युत धक्का बसला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे भिल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण
गारबर्डी गाव शोकमग्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत