रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅली, फैजपूरचे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला सहकार्य
रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅली, फैजपूरचे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला सहकार्य
फैजपूर, दि. २८ (प्रतिनिधी): सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार (दि. २८ जून) रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानांतर्गत रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅली, फैजपूरच्या वतीने अंधारमढी या आदिवासी पाड्यावर जाऊन जनजागृती करण्यात आली. पोलिओचे समूळ निर्मूलन आणि पोलिओमुक्त भारताच्या ध्येयासाठी पल्स पोलिओ मोहिमेला सक्रिय सहकार्य करण्यात आले.
या उपक्रमात पालकांना पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व पटवून देत, लसीचे दोन थेंब मुलांना कायमच्या अपंगत्वापासून वाचवू शकतात, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्यही घेण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅली, फैजपूरचे अध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ, सचिव श्रीकांत भुयार, खजिनदार निलेश चौधरी, प्राचार्या भारती महाजन, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, युवराज चौधरी, राजाभाऊ चौधरी, असलम तडवी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ' या रोटरीच्या ब्रीदवाक्यानुसार शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आदी क्षेत्रांत सातत्याने रचनात्मक कार्य केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून पल्स पोलिओ मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्यात आल्याचे अध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी सांगितले. भविष्यातही समाजोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत