Contact Banner

रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅली, फैजपूरचा स्तुत्य उपक्रम; दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

rotary-club-satpuda-valley-faizpur-distributes-educational-

रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅली, फैजपूरचा स्तुत्य उपक्रम; दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

फैजपूर | प्रतिनिधी-

'स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ' या ब्रीदवाक्याला साजेसा सामाजिक उपक्रम राबवत रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅली, फैजपूर यांच्या वतीने तिळ्या व अंधारमढी या दुर्गम आदिवासी भागातील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थ व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.






रोटरी क्लब सातत्याने आरोग्य, पर्यावरण, शिक्षण आदी विविध क्षेत्रांत समाजोपयोगी कार्य करत असून, त्याच परंपरेचा भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत साहित्याचा अभाव जाणवत असल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅली, फैजपूरचे अध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ, सचिव श्रीकांत भुयार, खजिनदार निलेश चौधरी, प्राचार्या भारती महाजन, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, असलम तडवी, राजाभाऊ चौधरी यांच्यासह पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. "शिकून पोलीस, शिक्षिका, अधिकारी आणि डॉक्टर बनायचे आहे," अशा निरागस भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

रोटरी क्लबच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले असून, अशा प्रकारचे उपक्रम इतर सामाजिक संस्थांनीही राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.