Contact Banner

उरण पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी जगदीश शेलकर यांची नियुक्ती

 

uran-police-station-senior-police-inspector-jagdish-shelkar-appointed

उरण पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी जगदीश शेलकर यांची नियुक्ती

उरण लेवजगत न्यूज प्रतिनिधी-

उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनिफ मुलाणी यांची मुंबई येथे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) पदावर पदोन्नतीने बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर जगदीश सिताराम शेलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 29 जून रोजी सायंकाळी पदभार स्वीकारला.






जगदीश शेलकर यांनी पोलिस सेवेत कारकिर्दीच्या प्रारंभी गडचिरोलीच्या नक्षलवादग्रस्त भागात धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यानंतर त्यांनी उरण पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून सुमारे तीन वर्षे सेवा दिली. पुढे सीबीडी बेलापूर, नाशिक, पनवेल तालुका, न्हावा शेवा, सीबीडी वाहतूक शाखा तसेच मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यासह विविध ठिकाणी त्यांनी कर्तव्यदक्ष आणि शिस्तबद्ध अधिकारी म्हणून काम केले.

सेवेच्या काळात त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल केली असून, जनतेशी संवाद आणि विश्वासाचे नाते निर्माण करण्यातही ते यशस्वी ठरले आहेत.

विशेष म्हणजे, सुमारे 16 वर्षांपूर्वी उरण पोलिस ठाण्यात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली होती. त्यामुळे आता त्यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी झालेली नियुक्ती उरणसाठी महत्त्वाची मानली जात असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.