Contact Banner

सावदा ग्रामीण रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 

savda-rural-hospital-pulse-polio-campaign-inauguration-june-28-2026

सावदा ग्रामीण रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ






सावदा, दि. २८ (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ रविवारी सावदा ग्रामीण रुग्णालयात उत्साहात संपन्न झाला. या मोहिमेचे उद्घाटन दो बूंद जिंदगी के या जनजागृती अभियानांतर्गत सावदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष फिरोज खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रेणुका पाटील उपस्थित होत्या.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

ही पल्स पोलिओ मोहीम पुढील पाच दिवस शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी राबविण्यात येणार असून, रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी घराघरांत जाऊन पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देणार आहेत. पालकांनी आपल्या मुलांना पोलिओचे थेंब पाजून या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.