अक्षरनिवासी वेदांत व्याकरणाचार्य पूज्य भक्ती किशोरदासजी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली
अक्षरनिवासी वेदांत व्याकरणाचार्य पूज्य भक्ती किशोरदासजी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली
सावदा (प्रतिनिधी): अक्षरनिवासी वेदांत व्याकरणाचार्य पूज्य भक्ती किशोरदासजी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात आज भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित संत, हरिभक्त आणि मान्यवरांनी पूज्य भक्ती किशोरदासजी यांच्या अध्यात्म, वेदांत आणि संस्कृत व्याकरण क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या ज्ञान, सेवाभाव आणि संस्कारमय जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
श्रद्धांजली सभेला कोठारी स्वामी स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी अनंतप्रकाशदासजी, स्वामी भक्तीप्रियदासजी, शास्त्री श्रीजी स्वामी, मंदिराचे पुजारी सत्यप्रकाशदासजी, पत्रकार श्याम पाटील, जयेश पाटील, खुशाल भंगाळे तसेच मोठ्या संख्येने हरिभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भक्तिमय व भावपूर्ण होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत