Contact Banner

वै. डिगंबर महाराज दिंडी सोहळा बीडमध्ये दाखल; पावसानंतर भारुडातून प्रबोधन, वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत

 

Vitthal Devotion Echoes Across Beed

वै. डिगंबर महाराज दिंडी सोहळा बीडमध्ये दाखल; पावसानंतर भारुडातून प्रबोधन, वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत

आमोदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : दुर्गादास महाराज नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे प्रस्थान केलेली वै. डिगंबर महाराज दिंडी भर पावसातही अखंड विठ्ठल नामाचा गजर करत बीड शहरात दाखल झाली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिभावाने मार्गक्रमण करत होते. बीड येथे गोपाळदास विष्णुदास बियाणी व परिवाराच्या वतीने दिंडीचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व मुक्कामाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. पाऊस थांबताच सादर करण्यात आलेल्या भारुडाच्या कार्यक्रमाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. भारुडातून समाजप्रबोधनाचा संदेश देत भक्ती आणि संस्कारांची सांगड घालण्यात आली. दिंडीच्या आगमनाने संपूर्ण बीड शहर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.