अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रोझोदा येथे ५७ विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप
अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रोझोदा येथे ५७ विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप
रावेर लेवा जगत न्यूज प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रोझोदा (ता. रावेर) येथे सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. अक्षय सोनवणे मित्रपरिवार यांच्या वतीने जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, रोजोदा येथे आयोजित कार्यक्रमात ५७ विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी रोझोदा गावाचे लोकनियुक्त सरपंच पुष्कर फेगडे, उपसरपंच नारायण राणे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात रमेश आबा महाजन, रवींद्र चौधरी, संजू मेढे, अतुल मेढे, विनायक सोनवणे, दिनकर पाटील, खेमा सोनवणे, माजी सरपंच दीपक धांडे, दीपक महाजन, राजेंद्र सोनवणे, ललित धांडे, नितीन भंगाळे, शंतनू फेगडे, अतुल धांडे, भूषण राणे, रोशन सरोदे, ऋषिकेश पाटील, देवेंद्र सोनवणे, मोंटू पचरवाल, सचिन पाटील यांच्यासह अक्षय सोनवणे मित्रपरिवारातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून राबविण्यात आलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत