अजमेरहून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा शिरपूर फाट्याजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
अजमेरहून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा शिरपूर फाट्याजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
लेवाजगत न्यूज शिरपूर : राजस्थानातील अजमेर येथे देवदर्शन करून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा शिरपूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नाशिकमधील दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाविक अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते कारने नाशिककडे परतत असताना शिरपूर फाट्याजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मृतांची तसेच जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पुढील तपास सुरू आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत