भडगाव तालुक्यात पावसाचा कहर; आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत बात्सर येथे ५ बालके व ३ महिलांची सुखरूप सुटका
भडगाव तालुक्यात पावसाचा कहर; आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत बात्सर येथे ५ बालके व ३ महिलांची सुखरूप सुटका
लेवाजगत न्यूज भडगाव : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मौजे बात्सर येथे पाण्याची पातळी वाढल्याने ५ लहान बालके व ३ महिला घरात अडकून पडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत यशस्वी बचाव कार्य राबविले.
या बचाव मोहिमेदरम्यान पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील तसेच भडगावचे तहसीलदार घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत होते.
बचाव पथकाने सर्व ५ बालके व ३ महिलांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्यांची गावातच सुरक्षित निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सर्वजण सुरक्षित असून त्यांची आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.
प्रशासनाकडून परिसरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत