जळगावच्या गांधी मार्केटच्या बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी; आठवडे बाजार व मच्छी मार्केट परिसरही जलमय
जळगावच्या गांधी मार्केटच्या बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी; आठवडे बाजार व मच्छी मार्केट परिसरही जलमय
लेवाजगत न्यूज जळगाव -शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गांधी मार्केट परिसरातील बेसमेंटमधील सर्व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले असून, काही दुकाने तात्पुरती बंद ठेवावी लागली आहेत.
सध्या काही दुकानदार आवश्यक ती खबरदारी घेत व्यवसाय सुरू ठेवत असले, तरी पाणी साचल्याने ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. गांधी मार्केटसह आठवडे बाजार आणि मच्छी मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
संबंधित महापालिका व प्रशासनाच्या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, पाणी उपसण्याचे आणि आवश्यक उपाययोजनांचे काम सुरू करण्यात आले आहे. पाऊस कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत