Contact Banner

मातृसंस्थेप्रती जिव्हाळा! नूतन प्राथमिक विद्यामंदिरच्या 1995–96 बॅचची इन्व्हर्टर व बॅटरीची अनमोल भेट

chinawal-nutan-primary-school-1995-96-alumni-donate-inverter-battery


मातृसंस्थेप्रती जिव्हाळा! नूतन प्राथमिक विद्यामंदिरच्या 1995–96 बॅचची इन्व्हर्टर व बॅटरीची अनमोल भेट

चिनावल | प्रतिनिधी

शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथील 1995–96 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृसंस्थेविषयी असलेले प्रेम, आत्मीयता आणि कृतज्ञतेची भावना जपत शाळेला इन्व्हर्टर व बॅटरी सप्रेम भेट देत समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.






यासाठी आयोजित छोटेखानी पण भावनिक कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील भास्कर महाजन आणि मुख्याध्यापक गणेश सुभाष बाविस्कर यांच्याकडे इन्व्हर्टर व बॅटरी सुपूर्द करण्यात आली.

यावेळी निलेश नेमाडे, चिनावलचे पोलीस पाटील संदीप राठोड, अतुल धांडे, सिंचन नेहेते, हर्षाली राणे तसेच इतर माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण 1995–96 बॅचच्या वतीने ही भेट शाळेला अर्पण केली.

विशेष म्हणजे, सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून आर्थिक योगदान एकत्र करून ही भेट दिली आहे. विद्यार्थ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता यावेत आणि शाळेच्या मूलभूत सुविधांमध्ये भर पडावी, या उद्देशाने ही देणगी देण्यात आली.

यावेळी अध्यक्ष सुनील भास्कर महाजन यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, "शाळेचे माजी विद्यार्थी हीच शाळेची खरी संपत्ती असून त्यांनी आपल्या मातृसंस्थेशी जपलेली नाळ इतरांसाठी प्रेरणादायी आहे," असे गौरवोद्गार काढले.

मुख्याध्यापक गणेश सुभाष बाविस्कर यांनीही सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानत, "माजी विद्यार्थ्यांचे हे सहकार्य शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे ठरणार असून विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास याचा निश्चितच लाभ होईल," असे सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. भविष्यातही अशाच प्रकारचे सहकार्य लाभत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी जपलेली मातृसंस्थेची ही नाळ गावात आणि परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून सर्व स्तरांतून त्यांच्या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.