Contact Banner

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

 

dr-ulhas-patil-medical-college-celebrates-guru-purnima-at-jalgaon

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

जळगाव | प्रतिनिधी
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. गुरूपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयातील अकाउंट विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना वंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. विजय बाविस्कर, बांधकाम विभागाचे संजय भिरूड तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






तसेच गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही डॉ. उल्हास पाटील यांना पुष्पगुच्छ अर्पण करून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

याशिवाय डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, रजिस्ट्रार चेतन चौधरी आणि डॉ. मुकेश चौधरी यांनीही गुरूपौर्णिमेनिमित्त डॉ. उल्हास पाटील यांना वंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.