बुऱ्हानपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
बुऱ्हानपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
सावदा प्रतिनिधी -:
बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांतील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली असून, लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.
या विकासकामांच्या नियोजनासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थानिक नागरिकांच्या मागण्या, वाहतुकीच्या गरजा आणि शहरांतील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगाने सुरू असून, वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांना वळसा घालणाऱ्या बायपास मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या बायपासमुळे शहरांतील विद्यमान मुख्य रस्त्यांच्या विकासकामांवर परिणाम होऊ नये, यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
या पाठपुराव्याला यश मिळाल्यानंतर शहरांतील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणास मंजुरी मिळाली आहे. या कामामुळे अंतर्गत वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शहरांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन स्थानिक व्यापार, दळणवळण आणि विकासालाही गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
#RakshaKhadse #BurhanpurAnkleshwarHighway #Raver #Yawal #Faizpur #Savda #NHAI #ConcreteRoads #NationalHighway #JalgaonNews #MaharashtraNews #Development #Infrastructure #LewaJagatNews




कोणत्याही टिप्पण्या नाहीत