कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांना ‘राजपूत समाज भूषण’ पुरस्काराने गौरव
कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांना ‘राजपूत समाज भूषण’ पुरस्काराने गौरव
फैजपूर लेवजगत न्यूज प्रतिनिधी-
शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, पर्यावरण तसेच मानवसेवा, समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि निसर्गसेवा या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील इंग्रजी विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय छात्र सेना (NCC) अधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र रघुनाथ राजपूत यांना ‘राजपूत समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा ॲड. शीला सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कट्यार यांच्या हस्ते तसेच परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विलासदादा पाटील, दामोदर राजपूत, डॉ. विश्वजित सिसोदिया, विठ्ठलसिंग मोरे तसेच राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांना यापूर्वीही सर्वोत्कृष्ट NCC अधिकारी पुरस्कार, उत्कृष्ट जिल्हास्तरीय तालुका करिअर कट्टा समन्वयक पुरस्कार, मिर्झा गालिब पुरस्कार आणि सकाळ गौरवगाथा पुरस्कार अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी हा सन्मान समाजाप्रती केलेल्या कार्याची पावती असून भविष्यात अधिक जोमाने समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हॅशटॅग :
#CaptainDrRajendraRajput #RajputSamajBhushan #Faizpur #DhanajiNanaCollege #NCC #Education #SocialService #LevaJagat #JalgaonNews #MaharashtraNews




कोणत्याही टिप्पण्या नाहीत