सेवानिवृत्त मुख्याध्यापिका ज्योत्स्ना धनराज चौधरी यांचे निधन
सेवानिवृत्त मुख्याध्यापिका ज्योत्स्ना धनराज चौधरी यांचे निधन
फैजपूर (लेवा जगत न्यूज प्रतिनिधी) : येथील साने गुरुजी नगर येथील रहिवासी तथा मूळच्या भालोद येथील रहिवासी आणि विपुल विलास बोरोले प्राथमिक विद्या मंदिराच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका ज्योत्स्ना धनराज चौधरी (वय ६१) यांचे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्या शिक्षण क्षेत्रात कर्तव्यनिष्ठ व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता साने गुरुजी नगर, फैजपूर येथील निवासस्थानातून निघणार आहे.
लेवा जगत परिवाराकडून ज्योत्स्ना धनराज चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत