जिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार; रुग्णसेवेसाठी योगदानाचा गौरव
जिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार; रुग्णसेवेसाठी योगदानाचा गौरव
जळगाव प्रतिनिधी-राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त आज जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात डॉक्टरांचा सत्कार करून त्यांच्या रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी डॉ. डी. एन. ठाकूर तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दिवसरात्र रुग्णांची निस्वार्थ सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव व्हायलाच हवा, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
या प्रसंगी आरोग्य सेवक संजू अहिरे, पप्पू जगताप, वेदांत एज्युकेशनच्या संचालिका कु. किरण कापडणे व हर्षाली ढाके तसेच जन्मत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टरांच्या सेवाभावाला सलाम करत उपस्थितांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत