Contact Banner

आजोबांच्या तेराव्याच्याच दिवशी तरुणाची हतनूर पुलावरून उडी; दर्यापूरात शोककळा

young-man-dies-by-suicide-jumping-from-hatnur-bridge-on-grandfathers-terahvi-day-bhusawal-daryapur


आजोबांच्या तेराव्याच्याच दिवशी तरुणाची हतनूर पुलावरून उडी; दर्यापूरात शोककळा

भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील दर्यापूर येथील एका ३२ वर्षीय तरुणाने आजोबांच्या तेराव्याच्या दिवशीच हतनूर जलाशयावरील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, दि. ३० जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे दर्यापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूर येथील झुलेलाल किशोर कोळी (वय ३२) यांच्या आजोबांच्या तेराव्याचा कार्यक्रम सुरू असताना त्यांनी कोणालाही काहीही न सांगता आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १९ बीएस ९६२८) घरातून प्रस्थान केले. ते थेट हतनूर धरणाजवळील तापी नदीवरील पुलावर गेले. तेथे दुचाकी पुलाच्या कडेला उभी करून त्यांनी नदीत उडी घेतल्याचे समोर आले.






घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोहणाऱ्यांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. सायंकाळी सुमारे ७ वाजता त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर रात्री सुमारे १०.३० वाजता दर्यापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई असा परिवार आहे.

टीप: जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी भावनिक तणावात असेल किंवा आत्महत्येचे विचार येत असतील, तर विश्वासू कुटुंबीय, मित्र किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी त्वरित संपर्क साधा. वेळेवर मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.